विशेष प्रगती नसल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने दिला निर्णय
वीरेंद्र तावडेच्या अर्जावर स्वतंत्रपणे घेणार सुनावणी
मुंबई
ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या सातपैकी सहा आरोपीना बुधवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांच्या न्यायालयाने सहा आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केलेला असून आरोपी अनेक वर्षे तुरूंगात असून हत्या प्रकरणात विशेष प्रगतीही दिसून आलेली नाही, असा ठपका ठेवून न्यायालयाने आरोपींना जामिनावर तुरूंगातून सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपी वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्र सुनावणी घेणार असल्याचे यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सरकारी पक्षाने आरोपींच्या जामीन अर्जावर तीव्र विरोध केला होता. तथापि, हत्या प्रकरणाचा ठोस तपास करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. तपासात कुठलीही ठोस प्रगती दिसून येत नसताना आरोपींना दीर्घकाळ तुरुंगात डांबू शकत नाही, असे मत नोंदवत न्यायमूर्ती किलोर यांनी सहा आरोपींची जामिनावर तुरुंगाबाहेर सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच आणखी एक आरोपी वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.
हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामार्फत सुऊ होता. नंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक (सीआयडी), महाराष्ट्र यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तपास वर्ग करण्यात आला होता.
कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा चार दिवसांनी 20 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येप्रकरणातील सहभागाच्या आरोपाखाली सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बद्दी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींना २०१८-२०१९ या दरम्यान अटक करण्यात आली होती. या सहाही आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकावर न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांच्या एकाखंडपीठाने सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय बुधवारी जाहीर केला.
जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे याच्यासह सहा जणांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मंजूर केला. विशेष सरकारी वकिलांशी बोलून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात वाद मागण्याचा विचार सुरु आहे. अशी माहिती मेघा पानसरे यांनी दिली.
फिर्यादीची झाली उलट तपासणी
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या खटल्यातील फिर्यादी मुकुंद कदम यांची साक्ष जिल्हा न्यायालयात तिसरे जिल्हा व सत्र न्यायधीश एस. एस.तांबे यांच्यासमोर सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाचे वकिल वीरेंद्र इचलकरंजीकर आणि समीर पटवर्धन यांनी कदम यांची उलट तपासणी घेतली. सुनावणी दरम्यान, कदम यांनी गुन्ह्याती हकीकत आणि त्यांनी पाहिलेल दृष्य सविस्तररित्य कथन केले. पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








