२०० कंपन्यांचा ऐतिहासिक निर्णय
ब्रिटनमध्ये कामकाजाच्या आठवड्याची पुनर्रचना करण्याच्या मोहिमेंतर्गत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये युकेमधील २०० कंपन्यांनी कायमस्वरुपी चार दिवस कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर ५००० हुन अधिक कामगारांना वेतनात घट न होता कमी तासांचा फायदा होणार आहे.
चार दिवस कामकाजाच्या निर्णयाच्या समर्थकांचे म्हणणे आहे, की पाच दिवसांचा पॅटर्न हा पूर्वीच्या आर्थिक युगातील एक हँगओव्हर आहे. फाऊंडेशनचे मोहीम संचालक जो रायल म्हणाले की, “९-५, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा १०० वर्षांपूर्वी शोधला गेला होता आणि आता तो उद्देशासाठी योग्य नाही. आम्हाला अपडेट करायला खूप उशीर झाला आहे.”
५०% अधिक मोकळ्या वेळेसह, चार दिवसांचा आठवडा लोकांना अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतो. पगारात कोणतीही घट न होता चा दिवसांचा आठवडा कामगार आणि माल दोघांसाठीही फायेदशीर ठरु शकतो, अशीही माहिती मिळाली.
Previous Articleवेंगुर्लेतील आरोग्य शिबिरात ३५६ रुग्णांनी घेतला लाभ
Next Article आजचे भविष्य बुधवार दि. 29 जानेवारी 2025









