कोल्हापूर
राज्य शासनाने एस टीच्या भाडेदरात नुकतीच १४.९५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा फटका फटका सर्वसामान्य प्रवाशाला बसणार असून या भाडेवाढी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत असून आज कोल्हापुरात शिवसेना (उबाठा) गटाकडून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. तब्बल अर्धा तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.
याप्रसंगी या सरकारने भाडेवाढ ही सुरु केलेली आहे. ही रद्द व्हायला हवी. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे म्हणणे आहे, की त्यांना या भाडेवाढीबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून ही भाडेदर वाढ रद्द करा. यासाठी कोल्हापूर शिवसेना (उबाठा) यांच्यातर्फे हे चक्का जाम आंदोलन करण्यात आलेले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी दिली.
Previous Article…अन् दापोलीवासियांचा आनंद झाला द्विगुणित !
Next Article भरधाव वेगाने कार चालून झाडावर आदळली








