सपाट पाय किंवा प्लॅट फीट, पेस प्लॅनस हा एक पाऊलाची स्थिती आहे. ज्यामध्ये पायाच्या तळव्यातील वक्रता (आर्च) नसते. ज्यामुळे संपूर्ण तळवा हा जमिनीला स्पर्श करतो. पाऊलाची ही स्थिती भारतीयांमध्ये सामान्यतः आढळून येते.
यामध्ये लवचिक सपाट पाय (Flexible Flat Feet) आणि कडक सपाट पाय (Rigid Flat Feet) असे दोन प्रकार आहेत.
अनुवंशिकता, कमकुवत वक्रता, इजा किंवा आरोग्य समस्या, अयोग्य चप्पलांचा वापर, वाढीतील विलंब अशी सपाट पायाची लक्षणे आहेत.