जसप्रीत बुमराह आयसीसी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

मला नेहमीच कसोटी क्रिकेट खेळायचे होते. गत वर्ष माझ्यासाठी खूप खास होते. मी खूप काही शिकलो आणि संघासाठी सामनेही जिंकले. विशाखापट्टणम कसोटीतील ओली पोपची विकेट माझ्यासाठी सर्वात खास होती. कारण त्या विकेटनंतर सामन्याचा रोख बदलला. हा पुरस्कार जिंकल्याचा खूप आनंद आहे. -जसप्रीत बुमराहृ टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज

"

"

या पुरस्काराच्या शर्यतीत बुमराहने इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि जो रूट आणि श्रीलंकेचा युवा फिरकीपटू कामिंदू मेंडिस यांना मागे टाकताना पुरस्काराला गवसणी घातली आहे

Jasprit Bumrah

आयसीसीचा हा मानाचा पुरस्कार जिंकणारा तो भारताचा सहावा खेळाडू तर पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे.

Persimmon
Floral Pattern
Floral Pattern

बुमराहच्या आधी राहुल द्रविड (2004), गौतम गंभीर (2009), वीरेंद्र सेहवाग (2010), रविचंद्रन अश्विन (2016) आणि विराट कोहली (2018) यांनी हा पुरस्कार पटकावला होता

टीम इंडियासाठी मागील काही वर्षात गेमचेंजर ठरलेल्या बुमराहची गतवर्षी कामगिरी धमाकेदार राहिली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही त्याने शानदार गोलंदाजी करताना मालिकावीर पुरस्कार जिंकला.

बुमराहने 2024 मध्ये 13 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 71 विकेट घेत सर्वच गोलंदाजांना मागे टाकले