केएलई येथे प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव : संविधानाने आम्ही सारे एक या भावनेने जीवन जगत आहोत. देशात आरोग्य क्षेत्राची सामाजिक आरोग्य रक्षणात महत्त्वाची जबाबदारी आहे. देशाचा विकास आरोग्यपूर्ण समाजामुळेच शक्य आहे, असे सांबरा येथील एअरमन प्रशिक्षण केंद्राचे वायुसेना मेडल विजेते एअर कमांडर सूरज शंकर यांनी सांगितले. केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्र येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करून ते बोलत होते. नागरिकांच्या आरोग्य रक्षणात इस्पितळांना महत्त्व आहे. भारत सुधारित वैद्यकीय विज्ञानामुळे रुग्णसेवेत मदत झाली आहे, असेही एअर कमांडर सूरज शंकर यांनी सांगितले. युवकांनी संविधानाच्या शिकवणीचे पालन करीत देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी काहेरचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एन. एस. महांतशेट्टी, कॅन्सर इस्पितळाचे वैद्यकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. व्ही. डी. पाटील उपस्थित होते.









