४ दिवसांपासून दोघीही होत्या बेपत्ता
सिन्नरमधील घटनेनं खळबळ
नाशिक
नाशिकमधील सोनारी तालुक्यातील (साबरवाडी) येथील मायलेकींचा मृतदेह विहरीत आढळला आहे. चार दिवसांपासून या दोघी बेपत्ता होत्या. सिन्नर तालुक्यातील या घटनेमुळे सगळीकडे खळबळ झाली आहे. दरम्यान, या विवाहितेने बाळासह आत्महत्या केली, की घातपात झाला आहे? या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सदर विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. तिच्या ९ महिन्याच्या मुलीचा आणि आई मृतदेह घराजवळच काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळून आला.
पल्लवी संदीप बिन्नर आणि तिची ९ महिन्यांची मुलगी ज्ञानेश्वरी शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी भांडण झाल्यामुळे घरातून निघून गेल्या होत्या. शनिवारी विवाहितेच्या कुटुंबियांनी सिन्नर पोलिसांत दोघी मायलेकी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान सोमवारी (दि.२७ ) सकाळी घरापासूनच थोड्या अंतरावर असलेला एका विहिरीत पल्लवी बिन्नरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या संदर्भात सिन्नर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पल्लवीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. गोविंद तुपे यांनी पाणबुडीच्या सहाय्याने पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर विहीरीतून बाळाचा मृतदेह शोधून काढला. पोलिसांनी तणावाची स्थिती विचारात घेऊन लागलीच तिचा नवरा, सासू-सासरे यांना ताब्यात घेतले.
Previous Articleझूम प्रकल्पातील आग आटोक्यात
Next Article वैद्यकीय महाविद्यालयाची कामे गुणवत्तापूर्ण करा








