जिल्ह्याचे नवनर्वाचित पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, महपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्राप्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी , ऑलिंपिक कांस्यपदक विजेता व अर्जून पुरस्कार प्राप्त स्वप्नील कुसाळे, वर्ल्ड कप खो- खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेती वैष्णवी पवार आदींना सन्मानित करण्यात आले.