वृत्तसंस्था / ग्रेटर नोयडा
शनिवारी येथे झालेल्या चौथ्या पिकलबॉल राष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांच्या विभागात टॉपसिडेड राहुल बेलवालने तर महिलांच्या विभागात प्रियांका मेहताने विजेतेपद मिळविले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात राहुल बेलवालने दिल्लीच्या संतोष भगतचा 11-4, 11-10, 12-10, असा पराभव केला. तर महिलांच्या एकेरीत प्रियांका मेहताने मोनिका मेननवर 11-2, 5-11, 11-9 अशी मात केली.









