सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर
वसाहत रुग्णालय गांधीनगर ता. करवीर येथे सोमवार दि. २७ रोजी स. ९ ते दु. ४ दरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आहेत.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांची प्रमुख उपस्थितीत आहे.
शिबिरात पोट विकार, मधुमेह, रक्तदाब, कान नाक घसा तपासणी, डोळ्यांची तपासणी, त्वचारोग, अस्थिरोग, दंतरोग, लहान बाळांची तपासणी, मूत्ररोग, स्त्रीरोग सर्व निदान व त्त्यावरील उपचार प्रत्येक तज्ञ डॉक्टरांकडून केले जाणार आहेत. सर्वांचे रक्त – लघवी तपासणी, गरजेनुसार
ईसीजी, एक्स-रे करण्याची सोय केलेली आहे. तपासणीमध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढील तीन-चार दिवसात करण्यात येणार आहेत.
गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वसाहत रुग्णालय गांधीनगर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी केले आहे.
Previous Articleमहायुती म्हणजे अतिरिक्त मतांवर डल्ला मारून आलेले सरकार
Next Article बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी कणकवलीतील युवक ताब्यात








