उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन,अंबाबाईच्या कृपेने राज्यात पुन्हा महायुती सरकार- एकनाथ शिंदे
कोल्हापूर
पात्र लाडक्या बहिणींच्या बाबत ही योजना अशीच सुरु राहणार कुठेही खंड पडणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते आज (दि. २५) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणा बाबतीत महायुती सरकारची भूमिका मागील महायुती सरकार प्रमाणेच सकारात्मक आणि कायम आहे. मराठा समाजाला ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे. आताच्या आणि या आधीच्या महायुती सरकारनं मराठा समाजासाठी अनेक लाभदायक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं आरक्षण महाविकास आघाडीला टिकविता आलं नाही. उलट महाविकास आघाडी चे काही घटक या दहा टक्के आरक्षण रद्द करावं म्हणून न्यायालयात गेले आहेत.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देताना तसंच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देताना ओबीसी अथवा अन्य समाजातील आरक्षणावर आम्ही परिणाम होऊ दिलेलं नाही मराठा आरक्षणाची बाबतीत आम्ही ठाम असल्याचा निर्वाळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला.
Previous Articleतळवडे नंबर १ शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
Next Article भुस्खलन सौम्मीकरणाच्या प्रकल्पाचा अहवाल सादर करा








