मुंबई मंत्रालय उपजिल्हाधिकारी रघुनंदन सावंत
महाद्वार रोडवरील 8 व्यापाऱ्यांचा सन्मानपत्राने गौरव, महाद्वार रोड व्यापारी व हरिवाशी असोसिएशनने व्यक्त केली कृतज्ञता
कोल्हापूर
अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा राबवत असतानाच कोणत्याही रहिवाशी, व्यापारी व दुकानदारांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागले. तसेच सर्वजण कायमचे विस्तापीत होऊ नये या कडेही कटाक्ष असला पाहिले. जेथे जेथे गरज लागेल तेथे तेथे सर्वांना मदतीचा हात तर देऊच शिवाय सर्वाना न्याय मिळावा, याबाबत शासनाकडे पाठपूरावा कऊ, अशी हमी मुंबई मंत्रालयाचे उपजिल्हाधिकारी रघुनंदन सावंत यांनी गुऊवारी सायंकाळी येथे दिली.
महाद्वार रोड परिसरात पिढ्यांपिढ्या व्यापार करतानाच रोडचा नावलौकिक वाढण्यासाठी मोठे योगदान दिलेल्या व्यापाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ब्राह्मण सभा करवीर-मंगलधाममध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे महाद्वार रोड व्यापारी व रहिवाशी असोसिएशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनकडून सर्वांबद्दल कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव जोशी हे होते. यावेळी रघुनंदन सावंत व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते व्यापाऱ्यांचा सन्मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह अशा स्वऊपात गौरव केला. अंबाबाई मंदिराचे मानकरी बाळासाहेब जाधव, व्यावसायिक रजनिंकात गुरगुटे, सराफ व्यावसायिक बन्सीधर चिपडे, बेकरी व्यावसायिक सूर्यकांत वडगावकर, भांडी व्यापारी किरण वणकुद्रे, कापड व्यावसायिक सुभाष भांबुरे, श्रीकांत सारडा अशी गौरवमूर्तींची नावे आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शामराव जोशी म्हणाले, अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा राबवण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतू सर्वात आधी शासनाने रहिवाशी, व्यापारी व दुकानदारांना विश्वासात हे घेतलेच पाहिजे. कोणीच विस्तापीत होणार नाही हे डोळ्यासमोर ठेवून आराखडा राबवला जावा. कोरोना काळात महाद्वार रोड, ताराबाई रोडवरील सर्वच व्यापारी, दुकानदार आर्थिक अडचणीत आहेत. शिवाय विकास आराखड्याच्या भीती पोटी सर्वजण अस्वस्थ आहेत. तेव्हा न्याय मिळेल, अशीच पाऊले उचलून शासनाने सर्वांना भीती मुक्त करावे.
ललित गांधी म्हणाले, अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. शासनाने आधी पुनर्वसनाची हमी द्यावी, मगच आराखड्याची अंमलबजावणी करावी. व्यापारी, रहिवाशांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यापाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल. यावेळी होलसेल व्यापारी भालचंद्र परदेशी, असोसिएशनचे सचिव डॉ. गुऊदत्त म्हाडगुत, संचालक किरण धर्माधिकारी, सागर कदम, शिवनाथ पावसकर, शशिकांत देढिया, अमित माने, योगेश पोवार, विशाल कोरडे यांच्यासह अन्य संचालक, व्यापारी, दुकानदार व रहिवाशी उपस्थित होते. असोसिएशनचे विश्वराज जोशी यांनी सुत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष भालचंद्र लाटकर यांनी आभार मानले.
Previous Articleअनधिकृत बांधकाम विरोधात मळगाव माजी सरपंचांचे उद्या उपोषण
Next Article तळवडे नंबर १ शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा








