कोल्हापूर :
रक्त सांडू प्रसंगी प्राण गेला तरी चालेल पण शक्तिपीठ महामार्गसाठी जमिनीला हात लावू देणार नाही, अशी ठाम भूमिका शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचा निर्धार केला. शक्तिपीठ महामार्ग विरोधात शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन झाले. त्यास पाठिंबा म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीच्या वतीने महाधरणे आंदोलन करण्यात आली. यासंदर्भातील मागण्याचे निवदेन पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.
यावेळी समितीचे समन्वयक गिरीष फोंडे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गसाठी आता 10 पट दर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आंदोलनात फुट पाडण्यासाठी हा डाव आहे. कोल्हापूरला यातून वगळले असल्याचे जाहीर केले जात आहे. परंतू बेसावध राहून चालणार नाही. संपूर्ण राज्यातून हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. कोल्हापुरातील टोल विरोधात ज्याप्रमाणे सहा ते सात वर्ष आंदोलन सुरू होते. त्याच धर्तीवर शक्तिपीठ महामार्गासाठी आंदोलन तेवत ठेवावे लागणार आहे.
शिवाजी मगदूम यांनी कोल्हापूर वगळून गोव्याकडे कसा रस्ता नेणार आहे, याचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी केली. यावेळी आनंदा पाटील, के.बी. पाटील, आनंद देसाई, मच्छींद्र मुगडे, दादासाहेब मगदुम यांनी मनगोत व्यक्त केले. संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेतकरी वाचवा देश वाचवा जय जवान जय किसान, कंत्राटदार धार्जिणा शक्तीपीठ महामार्ग म्हणून पाडा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी मधुकर पाटील, बाबू मेटकर, नितीन पाटील, बाळासो कुडाळकर, धम्माप्पा पाटील, आशुतोष पाटील, प्रसाद पाटील, शिवाजी कांबळे, कुलदीप पवार, धनपाल पाटील. युवराज कोईगडे, युवराज पाटील, युवराज शेटे, शामराव पाटील यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
- शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम
सम्राट मोरे म्हणाले, या प्रकल्पामुळे अल्पभुधारक शेतकरी अडचणीत येणार आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे तर राज्यातून हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे. काहींनी या प्रकल्पाच्या समर्थनार्थ निवेदन दिल्याचे समजते. हे म्हणजे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा काम आहे. आंदोलनात फुट पाडण्यासाठी 10 पट दर देणार असल्याची सांगितले जात आहे. ही नुकसान भरपाई दिशभूल करणार आहे.
- कोल्हापूरातून महामार्ग रद्द : पालकमंत्री आबिटकर
गिरीश फोंडे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना महामार्ग पर्यायी कसा जाणार आहे, याचे नोटिफिकेशन काढा. भुदरगड मतदारसंघात काही एजंट हा महामार्ग पाहिजे, असा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर जरब बसवा, अशी मागणी केली. यावर मंत्री आबिटकर यांनी आपण महामार्ग रद्दचे आपले काम केले आहे, महामार्ग करा असा चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे, असे सांगितले.








