वृत्तसंस्था / मेलबर्न
2025 च्या टेनिस हंगमातील येथे सुरू असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शुक्रवारी ऑस्ट्रेलियाच्या ओलीव्हिया गॅडेकी आणि जॉन पीयर्स यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या इतिहासात 58 वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या जोडीने मिश्ा़dर दुहेरीचे विजेतेपद यावेळी मिळविले आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ओलीव्हिया गॅडेकी आणि जॉन पीयर्स यांनी जॉन पॅट्रीक स्मिथ आणि किंबर्ली बिरेल यांचा 3-6, 6-4, 10-6 अशा सेटमध्ये पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन वाईल्डकार्डधारक जोडीमध्ये अंतिम लढत खेळविली गेली. ऑस्ट्रेलियाच्या जॉन पीयर्सने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत ऑलिम्पिक सुवर्णपदक तसेच ऑस्ट्रेलियन पुरुष दुहेरीचे जेतेपद आणि 2022 अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीतील अजिंक्यपद मिळविले होते.









