यमनापूर ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : फायनान्स कंपन्याकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी पाच ते सहा महिन्यांची मुदत मिळवून द्यावी अशी मागणी यमनापूर ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. बेळगाव, बैलहोंगल, खानापूर, हुक्केरी, गोकाक, आदी स्थळावरील फायनान्स व काही बँकांकडून यमनापूर ग्रामस्थांनी कर्ज घेतले आहे. मात्र कर्जफेड करण्यास शक्य होत नाही. फायनान्स कंपन्या व बँकांनी पाच-सहा महिन्यांची मुदत दिल्यास कर्जफेड करणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन फायनान्स कंपन्या व बँकांना सूचना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सांतू बागराई, शानू तोकली, हुल्लेप्पा बंबरगी, दिवाकर मासेनट्टी, श्रीधर नायक, लक्ष्मण कोंकणी, लक्ष्मण पाटील, हुल्लेप्पा गंगेनहाळ, सिद्धाप्पा गुंडलगुंटी, बसू दनदवर आदी उपस्थित होते.









