‘बीएससी’ द टेक्स्टाईल मॉलतर्फे आयोजन : लकी ड्रॉच्या माध्यमातून असंख्य वस्तू वितरित
बेळगाव : ‘बीएससी द टेक्स्टाईल मॉल’ने ग्राहकांसाठी आणलेली ‘ड्रॉ आमचा बक्षीस तुमचे’ ही योजना आता फक्त तीन दिवस म्हणजे 26 जानेवारीपर्यंतच असणार आहे. आजपर्यंत 260 लकी विजेत्यांना चार टीव्हीएस ज्युपीटर, 10 डबल डोअर व्हर्लपूल फ्रीज, 10 एलजी 32” स्मार्ट टीव्ही, 22 रेडमीचे 5 जी स्मार्ट फोन, 14 व्हर्लपूल 7 केजी वॉशिंग मशीन, 19 सिंफनी एअर कुलर, 14 फिलिप्स साऊंड बार, 200 हून अधिक ग्राहकांना गिअर सायकल, मिक्सर, इस्त्री, टेबल फॅन, नॉनस्टिक तवा, इमर्जन्सी लाईट, वॉटर फिल्टर, इलेक्ट्रिक किटली अशा नामांकित ब्रँड्सच्या गृहोपयोगी वस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
आता आपले नशीब आजमावण्याच्या संधीचे शेवटचे फक्त तीन दिवस बाकी आहेत. योजनेची पारदर्शकता राखण्यासाठी ग्राहकांच्या उपस्थितीत व ग्राहकांच्याच हस्ते रोज सायंकाळी 6 वाजता लकी ड्रॉ काढण्यात येतो. बीएससी मॉलचे कर्मचारी किंवा त्यांच्या परिवाराचे सदस्य या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत. आजपर्यंत झालेल्या ड्रॉमध्ये विजेते झालेले ग्राहक बेळगावसह कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, हुबळी, धारवाड, खानापूर, अहमदाबाद, बैलहोंगल, निपाणी अशा परिसरातील, राज्यातील व शहरातील आहेत.
लवकरच सुरू होणाऱ्या लग्नसराईसाठी बीएससी मॉल परिपूर्णपणे सज्ज आहे. विशेष म्हणजे येथे एकाच छताखाली नवजात शिशूपासून वयोवृद्धांसाठी लागणारे सर्व प्रकारचे कपडे आहेतच, याशिवाय टाय, वॉच, बेल्ट, पर्स, चप्पल, मेकअप उत्पादने, खेळणी अशी अनेक उत्पादने येथे उपलब्ध आहेत. तीसुद्धा योग्य दरात व असंख्य पर्यायांसोबत. याशिवाय बीएससी मॉलची कमी दराची हमी, दर्जेदार कपडे, तेही अगदी योग्य उत्तम दरामध्ये आहेतच. चला तर मग त्वरा करा, संपूर्ण कुटुंबाची खरेदी येथूनच करा आणि नशीबसुद्धा आजमावा.









