बेळगाव
मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे जयंती
रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी बाळासाहेबांनी सीमाप्रश्नाबाबत दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. तसेच शिवसेना सीमाप्रश्नाबाबत कायम पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी म. ए. समितीचे मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, सरिता पाटील, रेणू किल्लेकर यासह दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे, विनायक बेळगावकर, दत्ता पाटील, भाऊ किल्लेकर, यासह शिवसैनिक उपस्थित होते.
मंगाईनगर येथे ठाकरे यांची जयंती
श्री मंगाईनगर, वडगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व श्री मंगाईनगर रहिवासी संघ आणि महिला मंडळ यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि मंगेश पोटे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेबांना सीमाभागातील जनतेबाबत असलेला आदर कथन केला. याप्रसंगी बहुसंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.









