कोल्हापूर :
डेंजर्स अॅडव्हेंचर्स अंथर्वेद स्पोर्ट्स ग्रुपच्या सदस्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांमध्ये जनजागृती केली. या ग्रुपचे सदस्य, राज्यभर दौरा करणार असून बुधवारी कोल्हापूरात ग्रुपचे आगमन झाले.ताराराणी चौकात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या सदस्यांचे स्वागत केले.
सर्वात लांब जागतिक अंतर पायी प्रवास करून गिर्यारोहक आणि गिनीज बुक, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डधारक असलेल्या तरुणांचा डेंजर्स अॅडव्हेंचर्स अंथर्वेद स्पोर्ट्स ग्रुप आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने,पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, नदी संवर्धन, बेटी बचाओ–बेटी पढाओ, रस्ता सुरक्षा–जीवन संरक्षण यासारख्या लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात.अशा लोककल्याणकारी योजनांमध्ये, डेंजर्स अॅडव्हेंचर्स अंथर्वेद स्पोर्ट्स ग्रुप चें सदस्य योगदान देत आहेत. सद्या रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील डेंजर्स अॅडव्हेंचर्स अंथर्वेद स्पोर्ट्सचे सदस्य यामध्ये सहभागी झाले आहेत. या उपक्रमात गोविंद आनंद, महेंद्र प्रताप, जितेंद्र प्रताप, निश्चल मोर्य यांचा समावेश आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी ताराराणी चौकात त्यांनी जनजागृती केली. चार चाकी वाहनधारकांना सीट बेल्ट लावणे, वाहन चालवताना घ्यावयाची खबरदारी याबाबत गोविंद आनंद यांनी मार्गदर्शन करत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहनही केले. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी एक जानेवारीपासून रस्ता सुरक्षा साप्ताह राबवण्यात येत असून दरवर्षी, अपघातामध्ये दीड लाखांच्यावर लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे या अनुषंगाने जनजागृती करत असल्याचे सांगितले.
यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोहित राठोड, डेंजर्स अॅडव्हेंचर्स अंथर्वेद स्पोर्ट्सचे सदस्य महेंद्र प्रताप, जितेंद्र प्रताप,निश्चल मोर्य आदि उपस्थित होते.








