आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या शिफारशीमुळे दिले पत्र
खानापूर : खानापूर रेल्वे स्थानक सल्लागारपदी भाजपच्या राजू रायका, गुंडू तोपिनकट्टी, प्रकाश निलजकर, सुनिल मासेकर, सुनिल नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्त खानापूर रेल्वे स्थानकात चिफ कमर्शियल इन्स्पेक्टर भीमाप्पा मेदार, स्टेशन सुप्रिडेंट राजीव कुमार यांनी नियुक्तीपत्र सुपूर्द करून त्यांचे स्वागत केले. आमदार विठ्ठल हलगेकर, माजी अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या शिफारशीनुसार दक्षिण, पश्चिम रेल्वेच्या उपविभागीय वाणिज्य साहाय्यक प्रबंधक यांनी राजू रायका, गुंडू तोपिनकट्टी, प्रकाश निलजकर, सुनिल मासेकर, सुनिल नायक यांच्या नियुक्तीचे पत्र खानापूर रेल्वे स्थानक कार्यालयात स्वागत करून सुपूर्द करण्यात आले. तसेच त्यांच्या कामकाजाची व जबाबदारीची माहिती देण्यात आली. नियुक्त झालेल्यांचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.









