राज्य सरकारने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय
वृत्तसंस्था/ प्रयागराज
महाकुंभमध्ये पार पडलेल्या योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक प्रस्तावांसोबत मिर्झापूर ते प्रयागराजपर्यंतच्या सहापदरी एक्स्प्रेसवेला मंजुरी देण्यात आली आहे. या महामार्गाला विंध्य एक्स्प्रेसवे नाव देण्यात आले आहे. लिंक एक्स्प्रेसवेच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. हा बुंदेलखंड एक्स्प्रेसवेर चित्रकूट येथून सुरू होत बारापर्यंत जाणार आहे. महाकुंभनगरच्या अरैल त्रिवेणी संकुलता मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
बागपत, हाथरस आणि कासगंजमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचाही प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. याचबरोबर प्रयागराज, वाराणसी आणि आगरा या महापालिका रोखे जारी करणार आहेत. प्रयागराजच्या विकासाकरता गुंतवणुकीचे अनेक प्रस्ताव सादर झाल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. वाराणसी, प्रयागराज समवेत सात जिल्ह्यांना धार्मिक क्षेत्राची मंजुरी मिळाली आहे. प्रयागराज, वाराणसी आणि आग्रा येथे मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मुरादाबादमध्ये 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.









