कोल्हापूर :
आकाश, ग्रह, त्यांची स्थिती, तारे, सूर्य, चंद्र, ग्रहणे याबाबत खगोलप्रेमी त्याबरोबरच समस्त नागरिकांना नेहमीच उत्सुकता व आकर्षण वाटत असते. अशीच एक दुर्मिळ घटना सद्यस्थितीत काही दिवस आकाशात आपण अनुभव शकणार आहोत, अशी माहिती खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली.
डॉ. कारंजकर म्हणाले, आपल्या सूर्यमालेमध्ये असणाऱ्या आठ ग्रहामध्ये खडका पासून बनलेले बुध, शुक्र, मंगळ तर वायुरुप अवस्थेत असणारे गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून अशे सात ग्रह पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या पैकी सूर्यमालेतील पहिला ग्रह बुध हा 26 जानेवारीपर्यंत सूर्योदय पूर्वी, पूर्व अणि दक्षिण पूर्व दिशेला शून्य डिग्री 35 मिनिटे उंचीवर काही काळ दिसणार आहे. हा सूर्यमालेतील पहिला ग्रह व सूर्याजवळ असल्याने तो फक्त ठराविक कालावधीत सूर्योदय अथवा सूर्यास्ताच्या वेळीच पाहण्याची संधी असते. बाकीचे सगळे ग्रह हे महिनाभर क्षितिजावर पाहावयास मिळतील. सर्व ग्रह हे सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात त्यामुळे ग्रहांच्या एका प्रदक्षिणा दरम्यान त्यांचे सूर्याभोवती अंतर बदलत रहाते.
आकाशात क्षितिजावर पश्चिम अणि दक्षिण पश्चिम यांच्या मध्यभागी 32 डिग्री 60 मिनिटे उंचीवर सूर्यमालेतील सहाव्या नंबर वर असणाऱ्या शनी ग्रहाचे दर्शन होईल तर त्याच्या वर बाजूला 34 डिग्री 49 मिनिटे अंतरावर सूर्यमालेतील दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या शुक्र ग्रह दिसेल. हे दोन्ही ग्रह डोळ्यांनी पाहू शकतो. त्याच्या वर असणाऱ्या आपल्या सूर्यमालेतील 8 नंबरचा ग्रह नेपच्यून हा 43 डिग्री 33 मिनिटे उंचीवर असून हा ग्रह मात्र पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता आहे. पूर्व अणि उत्तर पूर्व दिशेच्या मध्ये सूर्यमालेतील चार नंबर वर असणारा लाल रंगाचा मंगळ ग्रह 20 डिग्री 49 मिनिटे उंचीवर तर त्याच दिशेला वरच्या बाजूस पाच नंबर वरती असणारा सगळ्यात मोठा ग्रह गुरू हा 63 डिग्री 24 मिनिटे या उंचीवर पाहू शकाल हे दोन्ही ग्रह डोळ्यानी पाहता येतील. त्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या सूर्यमालेतील 7 नंबरचा ग्रह युरेनस 82 डिग्री 4 मिनिटे उंचीवर असून हा मात्र पाहण्याकरिता दुर्बिणीची आवश्यकता आहे. हे सर्व ग्रह पहाण्याकरिता कुठलीही अंधश्रद्धा पाळू नये कारण ही एक खगोलशास्त्राrय घटना आहे.








