द्वारका :
गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात सरकारने पुन्हा एकदा बुलडोझर अॅक्शन केली आहे. द्वारकेच्या 7 बेटांवर अवैध स्वरुपात निर्माण करण्यात आलेली बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. सरकारने एकूण 36 इमारतींना जमीनदोस्त केले असून यात अवैध स्वरुपात निर्माण करण्यात आलेली धार्मिक प्रार्थनास्थळं देखील सामील आहेत. द्वारकेतील बेटं ही सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची असल्याने तेथे तातडीने पावले उचलत अतिक्रमणं हटविण्यात आली आहेत.









