तैपेई :
तैवानमध्ये 6 तीव्रतेचा भूकंपचा धक्का जाणवला आहे. या भूकंपात 15 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी 12.17 (स्थानिक प्रमाणवेळेनुसार) वाजता दक्षिण तैवानमध्ये 6 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती युएस जियोलॉजिकल सर्वेने दिली आहे. तर तैवानाच्या प्रशासनाने भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी नोंद केली आहे. युजिंगपासून 12 किलोमीटर अंतरावर जमिनीत 10 किलोमीटर खोलवर या भूकंपाचे केंद्र राहिले आहे. बचाव दल सध्या नुकसानीचा आढावा घेत आहे. जखमींमध्ये एका मुलाचा समावेश असून त्यांना नानक्सी जिल्ह्यातील एका घरातून वाचविण्यात आले आहे. तर प्रांतीय महामार्गावरील झूवेई पूल तुटल्याचे समोर आले आहे.









