कोल्हापूर
कोल्हापूर शहरात मंगळवार पेठ येथे पाणी कनेक्शनच्या वसुलीसाठी गेलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आला. वेळेत बिल भरले नसल्याने कनेक्शन बंद करायला गेलेल्या पथकावरच हल्ला करून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. शहरातील मंगळवार पेठ परिसरात ही घटना घडली आहे. याप्रसंगी मीटर रीडर उमेश साळुंखे यांना बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेनंतर महापालिकेचे कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत.
Previous Article150 कोटीच्या ड्रेनेज प्रकल्पास जमीन खरेदी
Next Article येत्या काळात जिल्हा योगमय बनेल !








