धोकादायक इमारतीत रुग्णांवर उपचार
बेळगाव : मागील दोन-तीन वर्षांपासून अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलचे स्थलांतर होणार, अशी चर्चा रंगत होती. मात्र अद्याप हे स्थलांतर रखडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना धोकादायक स्थितीत असलेल्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलची इमारत जीर्ण झाली आहे. दरम्यान, येथील हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या सोयीखातर उद्यमबाग परिसरात स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र तीन वर्षे उलटली तरी हॉस्पिटल अशोकनगर येथेच आहे. स्थलांतर प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे रुग्णांबरोबर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. उद्यमबाग, मच्छे परिसरातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासाठी उद्यमबाग परिसरात ईएसआयचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली जात होती. यानुसार उद्यमबाग परिसरात हॉस्पिटल स्थलांतरासाठी प्रयत्न झाले. मात्र अद्याप हॉस्पिटलचे स्थलांतर लांबणीवर पडले आहे.
धोकादायक इमारत
जीर्ण अवस्थेत असलेल्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. भिंतींना तडे गेले आहेत. तरीदेखील या इमारतीत अनेक कामगारांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.









