ज्ञानेश्वर महाराज बंडकर यांचे प्रतिपादन : बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत गुंफले दुसरे पुष्प
बेळगाव : वारकरी ही अशी परंपरा आहे, जिथे कर्मकांडाला स्थान नाही. आजच्या एकविसाव्या शतकात स्त्राrमुक्तीची चळवळ उभी राहते, परंतु संत बहिणाबाईंनी सतराव्या शतकात तुकारामांना गुऊ मानून अभंगांची रचना स्वत:च्या नावाने केली होती. त्यामुळे सामाजिक समानता, भूतदया, स्त्राr-पुऊष समानता यांची शिकवण संत परंपरेतून मिळते. त्यामुळे आजच्या काळात समाजाला दिशा देण्याची ताकद ही संतांच्या विचारांमध्ये असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प रविवारी सांगोला येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी गुंफले. त्यांनी संत विचार आणि समकाळ या विषयावर समर्पक माहिती दिली. आज काळ लोटला तरी जातीपातीच्या भिंती अद्यापही तशाच आहेत. त्यामुळे या समाजाला संतांच्या विचाराची गरज आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेला कुठलाही भक्त हा वारकरी ठरतो, मग तो कोणत्याही धर्माचा असो अथवा जातीचा. त्यामुळेच संत परंपरेमध्ये अनेक मुस्लीम संतही होऊन गेल्याचे त्यांनी सांगितले.
संत नामदेव हे शिंपी समाजाचे होते. परंतु परिसा भागवत या ब्राह्मणाने त्यांना गुऊ मानले. बहिणाबाईंनी संत तुकारामांना गुऊ मानून जातीच्या भिंती तोडल्या. भालचंद्र भैरट या ब्राह्मण व्यक्तीने दादा महाराज सातारकर या न्हावी जातीच्या संताला गुऊ मानले. यावरून संतांनी कधीच स्त्राr-पुऊष अथवा धर्म मानला नाही. त्यामुळे संतांचे विचार समाजाला नेहमीच प्रेरणादायी ठरणारे आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रसाद पंडित यांचे आज व्याख्यान
बॅ. नाथ पै व्याख्यानमालेमध्ये सोमवार दि. 20 रोजी बेळगावचे प्रसाद पंडित यांचे माझा नाट्याप्रवास या विषयावर व्याख्यान होणार आहे. हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या एसीपीआर सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानास रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.









