रस्त्यांची दयनीय अवस्था : नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर आणि परिसरात रस्त्यांचे खोदाई सत्र सुरूच आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून सदर रस्त्यांच्या दुऊस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. एलअॅण्डटीसह काही खासगी अपार्टमेंट मालकांकडून डेनेजलाईन घालण्यासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी न घेता मनमानीपणे खोदकाम केले जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर आणि उपनगरांतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, एलअॅण्डटीकडून 24 तास पाण्यासाठी जलवाहिनी घालण्यासाठी जिकडेतिकडे खोदकाम केले जात आहे. त्याचबरोबर गॅसलाईन घालण्यासाठी खोदाई केली जात आहे. त्यामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. खोदकाम करून त्यावर माती ओढण्यात येत आहे. पण डांबरीकरण किंवा काँक्रिट घातले जात नसल्याने चरित अवजड वाहने अडकून पडत आहेत. त्यातच आता काही ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या अपार्टमेंट मालकांकडून ड्रेनेजलाईन घालण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. काकतीवेसकडून गणपत गल्लीकडे जाणाऱ्या रिसालदार गल्लीच्या क्रॉसवर डेनेजलाईन घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.









