बाळेकुंद्री :
पंत बाळेकुंद्री पंतनगर येथील शिव मंदिरात सुळेभावी प्राथमिक आरोग्य केंद्र, पंत बाळेकुंद्री ग्रा. पं. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात महिला व युवकांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेतला. यावेळी 40 हून रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये रक्तगट आणि हिमोग्लोबीन तपासणीचा अनेकानी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन पंत बाळेपुंद्री ग्रा. पं. अध्यक्षा गुलाबी कोलकार, आरोग्य शिक्षणाधिकारी बसवराज यलिगार, बेबी हसिना जमादार, एस. टी. दयनावर, डॉ. वैशाली सुळेभावी, आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. महांतेश मंत्तूर व गावातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. रक्तदान हे जीवनदान आहे. अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते. शिबिरात केलेले रक्तदान कोणालातरी जीवनदान देत असते. तसेच कोणाच्यातरी रक्तदानाने आपल्या अथवा जवळच्या व्यक्तीना जीवनदान मिळते असे डॉ. वैशाली यांनी सांगितले. यावेळी गावातील एस. बी. पाटीलसह प्रतिष्ठित नागरिक व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.









