परूळे प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील परूळे गावात वारंवार खंडीत होणाऱ्या इंटरनेटमुळे गावातील सर्वच बँकांची सिस्टीम तासनतास ठप्प होत असल्याने परूळे ,म्हापण पंचक्रोशीतील लोकांचे मोठे हाल होत आहेत.परूळे गावात सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँका बदलत्या काळात इंटरनेटवर अवलंबुन आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून गावात इंटरनेट सेवा बंद पडून बँकाचे कामकाज दिवसदिवस ठप्प राहण्याचे प्रकार अनेकवेळा घडत आहेत. यामुळे बँकिंग कामकाजासाठी येणाऱ्या ग्राहकांना तात्कळत दिवसभर राहून आपले काम न करता पुन्हा घरी जाण्याची वेळ येत आहे. त्यात वीज पुरवठा खंडित झाला की बँक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व कामकाज बंद होते. गेल्या दोन महिन्यांपासून बँकेतील इन्व्हर्टर सिस्टीम बंद आहे आणि ह्या बँकेमध्ये किनारपट्टीच्या मच्छीमार ग्राहकांचे बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात असतात. मात्र लाईट गेल्यानंतर ठप्प झालेल्या कामकाजामुळे या ग्राहकांना नाहक त्रासाला बळी पडावे लागत आहे. तसेच सर्व बँकांना इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या परूळे येथील बीएसएनएल टॉवरमध्येही बॅटरी उपलब्ध नसल्याने गेले वर्षभर वीज पुरवठा खंडित झाला की नेटवर्क गायब होते. परिणामी ग्राहकांना ओटीपी अथवा इतर इंटरनेट कामात अडथळे येत आहेत. याबाबत तात्काळ संबंधित विभागाने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









