कोल्हापूर :
म्हासुर्लीपैकी रातांबीचा धनगरवाडा (ता. राधानगरी) परिसरातील रस्त्यावर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात बाबुराव सोनबा घुरके (वय 35, रा. मासुर्लीपैकी रासांबीचा धनगर वाडा) हे जखमी झाले. बाबुराव हे आपल्या दुचाकीवरून ऊस तोडणीच्या कामासाठी निघाले होते. दरम्यानच्या काळात जंगली प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. नातेवाईकांनी जखमी बाबुराव यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. घडल्या घटनेची सीपीआरमधील पोलीस चौकीमध्ये नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी : बाबुराव हे रोज पहाटे अथवा सकाळी सहाच्या सुमारास ऊस तोडणी कामसाठी जात असतात. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी पहाटे ऊस तोडणी कामासाठी आपल्या दुचाकीवऊन निघाले होते. परंतू सकाळचे आठ वाजले तरी ते कामावर पोहोचले नव्हते. त्यामुळे कामावरील ठेकेदारांना बाबुराव हे कामावर का आले नाही, अशी विचारणा करण्यासाठी भाऊ धोंडीराम घुरके यांना फोन केला. परंतू बाबुराव हे कामासाठी पहाटेच घराबाहेर पडल्याचे धोंडीराम यांनी ठेकेदारांना सांगितले. त्यांना धेंडीराम यांनी भाऊ बाबुराव यांची शोधाशोध करायला सुऊवात केली. त्यात त्यांना रातांबीचा धनगर वाडा रस्त्यावर बाबुराव यांचे बुट व टोपी दिसून आली. आणखी थोडी शोधाशोध केल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास बाबुराव हे बेशुद्ध अवस्थेत आढळले.
त्याच्या शरीराची पाहणी केली असला छाती व कपाळावर नखांचे ओरखडे दिसून आले. त्यांना काही काळ घरी नेण्यात आले. दुपारी सव्वा बारा वाजता ते शुद्धीवर आले. परंतू त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी जखमेची तपासणी कऊन बाबुराव यांच्यावर हिंस्त्र प्राण्याचा झाला असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला आहे.







