कोल्हापूर / राजेंद्र होळकर :
ऊस तोडणीसाठी मजूर पुरवितो म्हणून करार केलेल्या ऊस तोडणी मुकादमांकडून जिह्यातील सुमारे 1 हजार 100 ऊस वाहतूक वाहनधारकांना सुमारे 100 कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी जिह्यातील अनेक पोलीस ठाण्यात फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमाविरोधात गुन्हे दाखल झाले असले तरी शेकडो मुकादमांना अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांभीर्याने दखल घेऊन संशयित मुकादमांना तत्काळ अटक करा असे स्पष्ट निर्देश जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते.
जिह्यात एकूण 23 साखर कारखाने असून त्यापैकी 16 सहकारी व 7 खासगी साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करण्यासाठी सुमारे 5 ते 25 लाखापर्यंतची गुंतवणूक कऊन ऊस वाहतूकदार व्यवसाय करतात. या वाहतुकदारांना ऊस तोडणी मुकादमाकडून उस तोडण्यासाठी मजूर पुरविले जातात. संबंधित तोडणी मुकादम आणि वाहनधारकांमध्ये झालेल्या करारानुसार मुकादमाने ऊस तोडणी मजूर पुरविणे अपेक्षित आहे. पण गेल्या तीन वर्षात शेकडो मुकादमांनी वाहतुकदारांना कोट्यावधी ऊपयांचा गंडा घातला आहे. यामध्ये जिह्यातील सुमारे सुमारे 1 हजार 100 ऊस वाहतूक वाहनधारकांची सुमारे 100 कोटीहून अधिक ऊपयांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीबाबत ऊस वाहतुकदारांनी पोलीस अधीक्षक व संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीवऊन पोलिसांनी फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमाविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
जिह्यातील काही पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुह्यातील संशयीत मुकादमांना अटक कऊन, त्याच्याविरोधी न्यायालयात दोषारोपपत्र सुध्दा दाखल केले आहे. पण काही पोलीस ठाण्यात संशयीत मुकादमाविरोधी अद्याप अटकेची कारवाई करण्यात आली नाही. ही गंभीर बाब प्रलंबित गुह्यामधून समोर आली. याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फसवणूक कऊन पसार असलेल्या संशयित मुकादमाचा शोध घेऊन, त्याच्याविरोधी कारवाई करावी, असा आदेश दिला आहे. त्यानुसार फसवणूक करणाऱ्या मुकादमांची चौकशी सुरु झाली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्याशी संपर्क
साधला असता त्यांनी अधिक माहिती सांगण्यास नकार दिला.
- एकाच पोलीस ठाण्यात 70 हून अधिक गुन्हे
जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यात ऊस वाहतुकदाराची फसवणूक केल्याबाबचे गुन्हे दाखल आहेत. एकाच पोलीस ठाण्यात 70 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या दाखल गुह्यातील काही गुह्यातील संशयित मुकादमांना अटक करण्यात आली आहे. तर अनेक मुकादमाविरोधी अटकेची कारवाई करणे बाकी आहे.
- अटकेच्या भितीमुळे अनेक मुकादमाची जिह्याकडे पाठ
फसवणूक कऊन पसार असलेल्या संशयित ऊस तोडणी मुकादमांनी अटकेच्या धास्तीने कोल्हापूर जिह्यात ऊस तोडणी मजूर घेऊन न येता दुसऱ्या जिह्यात ऊस मजूर घेऊन गेले आहेत. त्यामुळे जिह्यात ऊस तोडणी मजूराच्या पुरेशा टोळ्या आल्या नसल्याने ऊस तोडणीमध्ये संथ गती असल्याचे चित्र आहे.
- कोल्हापूर, सांगली जिह्यात सुमारे 1800 कोटी रूपयांची फसवणूक
गेल्या अडीच वर्षात कोल्हापुर आणि सांगली या दोन जिह्यातील ऊस वाहतूक वाहनधारकांची 1700 ते 1800 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीबाबत पोलीस गुन्हा दाखल करातात. आणि संबंधित मुकादम जामीन घेऊन सुटतात. हा गुन्हा दिवाणी स्वरूपाचा असल्यामुळे न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित राहतो. त्यामुळे गेल्या आठवड्यात याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांची भेट घेतली. अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दिवणी स्वरूपाचे न करता ते फौजदारी व आर्थिक फसवणूक म्हणून नोंद करावेत अशी त्यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी त्यांनी पुढील आठवड्यात याबाबत मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे सांगितले.
माजी खासदार राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना








