वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या जून, जुलै दरम्यान भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये भारत अ संघाचे इंग्लंड लायन्सबरोबर 4 दिवसांचे तीन सामने आयोजित केले आहेत. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होईल.
अद्याप 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण ही स्पर्धा 25 मे पर्यंत संपेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अलिकडे भारतीय संघाची न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबरच्या कसोटी मालिकेतील कामगिरी अत्यंत निकृष्ट झाल्याने बीसीसीआयने याची चांगलीच दखल घेतली आहे. कर्णधार रोहीत शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियातील पराभवामुळे भारतीय संघाचे आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले.
सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. उभय संघामध्ये पाच टी-20 सामने आणि तीन वनडे सामने खेळविले जाणार आहे. या मालिकेसाठी गेल्या शनिवारी 15 जणांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला होता. टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून कोलकत्ता येथे प्रारंभ होईल. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 25 आणि 28 जानेवारीला चेन्नई आणि राजकोट येथे खेळविला जाईल. चौथा सामना 31 जानेवारीला पुणे येथे तर पाचवा आणि शेवटचा सामना मुंबईत 2 फेब्रुवारीला होईल.
भारतीय टी-20 संघ: सुर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दीक पंड्या, रिंकू सिंग, नितेशकुमार रे•ाr, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नॉई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव ज्युरेल









