मुंबई
शाहीद कपूर आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘देवा’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. ३१ जानेवारी ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहीद कपूर एका माफीया कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मल्याळी सिनेमांचे दिग्दर्शक रोशन अॅण्ड्रुज यांच दिग्दर्शन आहे. रोशन यांचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे.
देवा हा चित्रपट दिग्दर्शक रोशन यांच्या ‘मुंबई पोलीस’ या २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहीद कपूर गुंडांशी अगदी स्वॅगमध्ये दोन हात करताना दिसतोय. देवामध्ये शाहीद कपूर हा पोलिस ऑफीसर असल्याचेही दिसत आहे. बघुया आता शाहीद कपूरचा हा देवा बॉक्स ऑफीसवर कीती कमाल करतो.
Previous Articleअंधारी प्रकरणात नामचिन गुंड दुबुले जेरबंद
Next Article सिध्दीविनायक चरणी आटपाडीचे डाळिंब अर्पण









