बीड
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण गाजत असतानाच आता, बीड जिल्ह्यात अजून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दोन सख्या भावांची निघृण हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. तालुक्यातील वहिरा नावाच्या गावात दोन सख्या भावांची जमावाने हत्या केली आहे. या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. यासंदर्भात पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली.
अजय भोसले आणि भरत भोसले अशी या मृत भावांची नावे आहेत. या घटनेत कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघे त्यांच्या गावात उभे होते, तेव्हा अचानक गावातील आणि गावा बाहेरील काही लोक जमा झाले. या सर्वांनी या तीनही भावांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्लात दोघा भावांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजले नसून मृतांचे शवविच्छेदन आष्टी ग्रामीण रुग्णालयात सुरु आहे. अंभोरा याप्रकरणी पोलिस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. बीड जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.
Previous Articleमच्छीमार जेटींवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा !
Next Article अंधारी प्रकरणात नामचिन गुंड दुबुले जेरबंद








