कोल्हापूर :
महापलिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रोज हजारो लिटर सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. एकीकडे पर्यावरण प्रेमी, पंचगंगा घाट प्रेमी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी धडपडत आहेत. दुसरीकडे काही लोकच पंचगंगा नदी प्रदूषित करण्याचे काम करत आहे. रात्रीच्यावेळी ओल्या पाट्या या ठिकाणी होत असून प्लास्टिक कचरा थेट नदीत किंवा परिसरात टाकला जात आहे. अशी स्थिती असल्यावर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

करवीर काशी असल्याने पंचगंगा घाटाला ऐतिहासिक महत्व आहे. जोतिबा, आंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणारे किंवा पर्याटक कोल्हापुरात आल्यानंतर अवर्जुन पंचगंगा घाटावर स्नान करतात. गेल्या काही वर्षापासून मात्र, पंचगंगा नदीचे प्रदूषणाच विषय गंभीर बनला आहे. कोल्हापूर शहरातील सुमारे 10 ते 15 एमएलडी सांडपाणी आजही रोज थेट नदीत मिसळत आहे. याचबरोबर साखर कारखाने, औद्योगिक संस्थांचेही काळेकुट्ट सांडपाणी पंचगंगा नदीतच सोडले जात आहे. महापालिका प्रशासन अथवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ पाण्याचे नमुने घेणे आणि संबंधितांना नोटीस बजाविण्या पालिकेकडे काहीच करत नाही. दोषींवर कडक कारवाई होत नसल्याने प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. यामध्ये भरीत भर आता काही लोक पंचगंगा घाटावर आल्यानंतर थेट पंचगंगा नदीत प्लास्टिक पिशव्यासह अन्य कचरा टाकून जात असल्याचे समोर येत आहे.

- ओल्या पार्टीवर कारवाईची गरज
पंचगंगा घाटावर ओल्या पार्टी होतात. जेवण झाल्यानंतर पत्रावळ्यासह मद्याच्या बाटल्या, सोड्याच्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या नदीत किंवा नदी परिसात टाकून जात आहे. अशा विघ्नसंतोषीवर मनपा आणि पोलिस प्रशासनाकडून कारवाई होण्याची गरज आहे.
- जे शक्य आहे ते तर करा?
महापालिका पंचगंगा आणि रंकाळा प्रदूषण रोखण्यात सपशेल फोल ठरली आहे. रंकाळ्यात श्dयाम सोसायटी येथील नाल्यातून सांडपाणी मिसळते. तर नदीमध्ये दुधाळी, बापट कॅम्प येथील सांडपाणी थेट नदी सोडले जात आहे. सध्या मनपाचे तीन एसटीपीच्या माध्यमातून 109 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते. उर्वरीत सांडपाणी रोखणे मनपाला सध्या तरी शक्य नाही. परंतू पंचगंगा घाटावर मानवनिमित्त जे काही प्रदूषण होत आहे ते रोखणे शक्य आहे.








