कोल्हापूर
कोल्हापूर हुपरी रस्त्यावर उचगाव येथे एका मोठ्या हॉटेल समोर चालू असलेल्या बांधकाम साईट आहे. या साईटवर किरकोळ कारणावरून वादवादी झाली. दरम्यान तरुणांच्याकडून तलवार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती तर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर आणि गांधीनगर सपोनि डॉक्टर सागर वाघ घटनास्थळी आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.








