दापोली :
प्रेम संबंधात अडथळा असणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा संतापजनक प्रकार दापोलीत उघडकीस आला आहे. दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील नेहा बागकर (वय 35) हिने आपले पती निलेश बागकर( वय 39) यांचा आपला प्रियकर मंगेश चिंचघरकर रा. पालगड याच्या मदतीने खून केला. या प्रकाराने दापोली तालुका पुरता हादरला आहे.
गळा आवळून खून केलेला मृतदेह पालगड येथील विहिरीतून पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी नेहा बागकर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर यांना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.








