वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारताचा युकी भांब्री व त्याचा प्रेंच साथीदार अल्बानो ऑलिव्हेटी यांना ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
स्थानिक वाईल्डकार्ड प्रवेशधारक खेळाडू ट्रिस्टन स्कूलकेट व अॅडम वॉल्टन यांनी त्यांच्यावर 6-2, 7-6 अशी मात केली. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. भांब्री-ओलिव्हेटी यांना तीन ब्रेकपॉईंट्स मिळाले, पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. मात्र त्यांच्याकडून पाचदा डबल फॉल्ट्स झाले. माजी अग्रमानांकित रोहन बोपण्णालाही कोलंबियाचा नवा साथीदार निकोलस बॅरिएन्टोस यांना पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले.









