दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा पुढाकार
ओटवणे प्रतिनिधी
राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते. या मोहिमेत किल्ल्यावरील प्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत पंकज गावडे, योगेश येरम, रोहन राऊळ, डॉ गणेश आनंदे, प्रसाद पेंडूरकर, यतिन सावंत, उत्कर्षा वेंगुर्लेकर, वेदांत वेंगुर्लेकर, प्रिती सावंत, विराज साळगावकर, समिल नाईक, गणेश नाईक आदी सदस्यांनी सहभाग घेतला.









