वार्ताहर/येळ्ळूर
शाकंभरी पौर्णिमेला येळ्ळूरमधील भक्तांच्यावतीने सौंदत्ती डोंगरावर परड्या भरण्याचा कार्यक्रम भक्तिभावाने झाला. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. या दिवशी दुपारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. एकाच ठिकाणी जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे पडल्या ठेवून पारंपरिक पद्धतीने गोंधळ व रेणुका देवीचा उदो उदो करण्यात आला. एवढा मोठा धार्मिक सोहळा सौंदत्ती डोंगरावर फक्त येळ्ळूर येथील भक्तांचा होत असतो. सोहळा वतनदार गोंधळी व भक्त मंडळ येळ्ळूरच्यावतीने पार पाडला जातो.









