महाकुंभ मेळाव्यात लाखोंचे लक्ष हर्षाने वेधून घेतले. ३० वर्षीय हर्षा रिचारिया  मॉडेल आणि अॅंकरींग करते.

हर्षा उत्तराखंडातून आली असून आचार्य महामंडलेश्वरांची शिष्या असल्याचेही सांगते.

शांत आयुष्य जगण्यासाठी  गेल्या दोन वर्षांपासून साध्वीचं आयुष्य जगत असल्याची माहिती.

महाकुंभ मेळाव्यात लोकांनी माझी वेशभूषा पाहताच मला जगातील सुंदर साध्वी म्हटले हे ऐकून चांगले वाटले. परंतु मला साध्वी म्हणले हे उचित नाही आहे. त्यासाठी मी अजून खोलवर गेलेली नाही आहे. अशी प्रतिक्रिया हर्षाने दिली.  

हर्षाने बीबीए केले असून ती १६ व्या वर्षापासून मॉडेलिंग करते. सुरुवातीला ती सुपर मार्केटमध्ये टुथपेस्टचे प्रमोशन करी. १८ व्या वर्षी तिला अॅंकरींगचे काम मिळाले. तिथे तिच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. तर आता महाकुंभ मेळाव्यात सर्वात सुंदर साध्वीवरून ट्रोल झाल्याने ती जगभरात पोहोचली.