तिरुअनंतपुरम :
केरळ उच्च न्यायालयाने मल्याळी अभिनेत्रीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटक करण्यात आलेला व्यावसायिक बॉबी चेम्मनूरला मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. चेम्मनूरचा पासपोर्ट यापूर्वीच न्यायालयात जमा करण्यात आला आहे. तर तपासादरम्यान चेम्मनूरला पोलीस स्थानकात हजेरी लावावी लागणार आहे. महिला अभिनेत्रीविषयी चेम्मनूरची टिप्पणी दुहेरी अर्थयुक्त नव्हती असेही म्हणता येत नाही असे न्यायाधीश पी.व्ही. कुन्हिकृष्णन यांनी म्हटले आहे.









