कोल्हापूर :
थेट पाईपलाईनच्या व्हीएमडी कार्डमध्ये बिघाड झाल्याने सोमवारी शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. थेटपाईपलाईनवर अवलंबून असलेल्या ए, बी आणि ई वॉर्डमध्ये पाणीपुरवठा सोमवारी दुपारी 12 नंतर ठप्प झाला.
दुपारनंतर व्हीएमडी कार्डच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या बिघाडामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनला उपसा करणारे दोन पंप बंद राहिले. सोमवारी रात्री उशिरा हे काम पूर्ण झाले. यानंतर थेट पाईपलाईनमधून पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र दुपार नंतर ज्या भागात पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी मात्र पाणीपुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला.








