CEIR पोर्टलच्या मदतीने वेंगुर्ले पोलिसांचा यशस्वी तपास
वेंगुर्ले (वार्ताहर)-
कुडाळ नेरुर येथील यशस्वी रमेश चव्हाण यांचा सॅमसंग एस-3 हा मोबाईल दि. 29 नोव्हेंबर रोजी वेंगुर्ले येथे हरवलेला होता. सदरचा मोबाईल हा सी.ई.आय.आर. CEIR या तांत्रिक पोर्टलच्या सहाय्याने वेंगुर्ला पोलीस ठाणे येथील महिला पोलीस हवालदार दीपा मठकर व सुषमा देवगडकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दिड महिन्यात यशस्वी तपास करीत परत मिळविला आहे.सदरचा मोबाईल वेंगुर्ले पोलीस स्टेशन मध्ये यशस्वी चव्हाण यांच्याकडे महिला पोलीस हवालदार दीपा मठकर व सुषमा देवगडकर यांनी सुपूर्द केला असून वेंगुर्ले पोलीस यंत्रणेच्या या उत्कृष्ट तपास व कामकाजाबाबत जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.









