ड्रेनेज गळतीची समस्या : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
बेळगाव : वडगाव, सिद्धिविनायक मार्ग येथे ड्रेनेजला गळती लागून विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील पंधरा दिवसांपासून दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे. याबाबत मनपा प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. ड्रेनेजची गळती दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. परिसरातील ड्रेनेज लाईन खराब झाल्याने विहिरीत दूषित पाणी मिश्रित होऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच वाढत्या रोगराईने जनता हैराण झाली आहे. त्यातच विहिरींचे पाणी दूषित झाल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.









