परुळे/ प्रतिनिधी
परूळे युवक कला क्रीडा मंडळ परुळे आयोजित स्व.ऍड अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय ३४ व्या एकांकिका स्पर्धेत श्री समर्थ कलाविष्कार ग्रुप, देवगडची मशाल प्रथम तर रंगयान नाट्य संस्था, इचलकरंजी- चरचणाऱ्या फँटसीचे युद्ध व्दितीय तर गायन समाज देवल क्लब कोल्हापूर, यांची अल्मोर डेड तृतीय सांधिक उत्तेजनार्थ नाटक नाटकवेडे, रत्नागिरी विठाई, प्रेक्षकप्रिय एकांकिका मुख्तलीफ थेटर कोल्हापूर यांची – निर्भर यांची निवड करण्यात आली.वैयक्तिक पारितोषिके पुरुष अभिनय प्रथम अभिनव कुरणे – चरचणाऱ्या फँटसीचे युद्ध , द्वितीय दिपक जानकर – मशाल ,तृतीय विशाल दुराफे – ओळखी, दृष्टी पुणे स्त्री अभिनय प्रथम सानिका कुटे – ऑफलदिन व्दितीय जान्हवी जाधव – चारू तृतीयः प्राजक्ता नेरुडकर-जापसाल दिग्दर्शन प्रथम : विजय कदम – मशाल,द्वितीय : कांदबरी माळी – चरचरणाऱ्या फँटसीचे युद्ध तृतीय : प्रमोद पुजारी – अलमोष्ट डेड प्रकाश योजना प्रथमः शेखर मूळे निर्झर – संगीत संयोजन
प्रथमः अनुपान दाभाडे – अलमोन्ट डेड नेपथ्य प्रथम श्री समर्थ कलाविष्कार देवगड मशाल सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका साहिल दिलीप जाधव मशाल समाजप्रबोधनपर एकांकिका निर्मिती थिएटर्स, कुडाळ – ऑफलाईन निवड करण्यात आली. पारितोषिक वितरण सोहळ्यास परूळे सरपंच प्रणिती आंबडपालकर डॉ. उमाकांत सामंत , ऍड .प्रमोद देसाई ,आदिनारायण देवस्थान अध्यक्ष सचिन देसाई, उपाध्यक्ष आनंद देसाई ,अविनाश देसाई, पत्रकार भूषण देसाई आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा नाईक यांनी केले तर प्रास्ताविक प्रथमेश नाईक आणि अजित परूळेकर यांनी केले .









