500 स्पर्धकांची उपस्थिती, 300 पंचांचाही समावेश, 26वर्षानंतर पुन्हा होणार पिळदार शरीराचे कसब
बेळगाव : इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे 16 वी सिनीयर पुरुष शरीरसौष्ठव व महिला मॉडेल फिजिक स्पर्धा 14 ते 16 जानेवारी रोजी अंगडी कॉलेज मैदान, सावगांव रोड, बेळगाव येथे होणार आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून देशातील 16 युनिटमधील 500 स्पर्धक व 300 पंच उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वर्ल्ड बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे सचिव चेतन पठारे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. हॉटेल सन्मान येथे ते बोलत होते. यावेळी आयबीबीएफचे अध्यक्ष रमेशकुमार, सचिव हिरल सेठ, मि. वर्ल्ड प्रेमचंद्र डिगरा, मधुकर तळलकर, टी. व्ही. पॉली, भास्करन्, तुलशी सुजल, अजित सिद्दन्नावर, सुनील आपटेकर, बॉबी सिंग आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या स्पर्धा रोटरी क्लब ऑफ बेळगाव, कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर व बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने होणार आहेत. ही स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या नियमानुसार होणार आहे.
सदर स्पर्धेत 16 युनिटमधून 500 स्पर्धक देशातील वेगवेगळ्या राज्यातून सहभागी होणार असून 300 पंचही उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि. 14 रोजी स्पर्धेची नोंदणी व वजने घेण्यात येणार असून सकाळी अन्नोत्सव येथे रॅली निघणार आहे. 15 रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून त्या दिवशी फ्रि पोझिंग होणार असून 16 रोजी प्रमुख स्पर्धा होणार आहे. या संघटनेत पद्मभूषण, तीन अर्जुन पुरस्कार विजेते सहभागी असतील. 23 वर्षानंतर या स्पर्धा बेळगाव शहरात होत आहेत. 2003 साली बेळगाव शहरात प्रथम ‘मि. इंडिया’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. बेळगाव शहर हे शरीरसौष्ठव क्षेsत्रात संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे. भारतातील जुन्या शरीरसौष्ठव स्पर्धा एक जुनी बेळगाव श्री स्पर्धा गेली 59 वर्षे सातत्याने घेतली जात आहे. 16 व्या सीनियर पुरुष महिला स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून रेल्वे, पोलीस, सर्विसीस अशा विविध संघातून 500 हून अधिक स्पर्धक व 250 अधिक ऑफिशियल भाग घेणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना दिली जाणारी 25 लाखहून अधिक रक्कमेची बक्षिसे सतीश जारकीहोळी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणार आहेत. याचबरोबर बेळगाव येथील दानशूर क्रीडाप्रेमी, संघ संस्था, उद्योगपती, व्यवसायिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे,
चेतन पठारेची फेरनिवड 
महाराष्ट्राचे सुपूत्र चेतन पठारे यांची वर्ल्ड बॉडी बिल्डींग व फिजीक फेडरेशनच्या सचिवपदी फेरनिवड करण्यात आली आहे. वर्ल्ड बॉडी बिल्डींग फेडरेशनचे अध्यक्ष पॉल चुवा यांच्या अध्यक्षस्तेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत चेतन पठारेंची वर्णी पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. या उच्चपदावरती राहणारे चेतन पठारे हे पहिले भारतीय असून यापूर्वी यापदावरती बाहेरील देशातील पदाधिकारी होते. चेतन पठारे यांनी कार्य करत असताना भारतीय शरीरसौष्ठव संघटना उच्चस्तरावरती नेवून ठेवली आहे. त्याप्रमाणे एशियन फेडरेशन सुद्धा नवीन बदल करुन नावलौकिक केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवूनच पुन्हा त्यांना या पदावरती बिनविरोध निवड करण्यात आली आहे.









