वृत्तसंस्था/ राऊरकेला
हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या युपी रुद्राज संघाने दिल्ली एसजी पायपर्सचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात युपी रुद्राजला या विजयामुळे 3 गुण मिळाले.
या सामन्यात युपी रुद्राजतर्फे फ्लोरिस वर्टबोएरने 30 व्या मिनिटाला, केन रसेलने 43 व्या आणि टी. कोसिन्सने 54 व्या मिनिटाला गोल केले. दिल्ली पायपर्सतर्फे एकमेव गोल जॅक व्हिटॉनने केला. या सामन्यातील विजयामुळे युपी रुद्राज संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या संधी गमाविल्या. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दिल्ली पायपर्सने युपी रुद्राजवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. युपी रुद्राजने आपले तिन्ही गोल सामन्याच्या उत्तरार्धात केले.









