कुंभारवाड्यासह माजगावात शोककळा
ओटवणे प्रतिनिधी
माजगाव कुंभारवाडा येथील दोन रिक्षा चालकांचे सहा तासांच्या अंतराने निधन झाले. एकाच वाड्यातील दोन रिक्षा चालकांचे पाठोपाठ निधन झाल्यामुळे कुंभारवाड्यासह माजगावात शोककळा पसरली. रिक्षा चालक भास्कर सोमा भोगण (६१) यांचे शुक्रवारी मध्यरात्री नंतरच्या सुमारास निधन झाले. शनिवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. येथील दीप्तेश भोगण यांचे ते वडील होत तर श्रीराम प्रिंटिंग प्रेसचे मालक प्रमोद भोगण तसेच वेतोरे हायस्कूलचे शिक्षक तुकाराम भोगण यांचे ते भाऊ होत.रिक्षाचालक विजय बुधाजी भोगण (६२) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रविवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. येथील रिक्षाचालक सत्यवान भोगण आणि सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील आत्मानंद कृपा दुकानाचे मालक आनंद भोगण यांचे ते भाऊ होत तर माजगाव ग्रामपंचायत सदस्या माधवी भोगण यांचे ते चुलत सासरे होत.









