वृत्तसंस्था/ माद्रिद
ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात रेओ व्हॅलेकेनोने सेल्टा व्हिगोचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. व्हॅलेकेनो संघाने या स्पर्धेत घरच्या मैदानावर आतापर्यंत 14 सामन्यात हार पत्करलेली नाही.
या सामन्यात 5 व्या मिनिटाला इम्बेरबाने व्हॅलेकेनोचे खाते उघडले. 21 व्या मिनिटाला इग्लेसिसने सेल्टाला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या उत्तरार्धात फ्रुटोसने हेडरद्वारे दुसरा आणि निर्णायक गोल करुन सेल्टाचे आव्हान संपुष्टात आणले.









